तर विराटला कर्णधारपद सोडावं लागेल; या खेळाडूने केला दावा
क्रीडा

तर विराटला कर्णधारपद सोडावं लागेल; या खेळाडूने केला दावा

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागतला तर विराट कोहलीला कर्णधारपद सोडावं लागेल, असा दावा इंग्लंडचा माजी स्पिनर मॉन्टी पनेसारने केला आहे. ‘विराट कोहली महान बॅट्समन आहे, पण टीमने त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या नेतृत्वात खेळलेल्या मागच्या 4 टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे यानंतर विराटवर दबाव वाढेल, रहाणेनेही कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता एकही पराभव झाला, तर विराटला कर्णधारपद सोडावं लागेल,’ असं पनेसार म्हणाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात 2-1 ने विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वात भारताचा ऍडलेडमध्ये पराभव झाला, यानंतर तो पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला, त्यामुळे रहाणेकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. सगळ्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झालेली असतानाही रहाणेनं नवख्या खेळाडूंना घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास घडवला. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये पितृत्वाची रजा संपवून आलेल्या विराट कोहलीकडे पुन्हा एकदा नेतृत्व देण्यात आलं.

पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 227 रनने पराभव झाला. भारतीय भूमीवरचा इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय आहे, तर चेन्नईमध्ये मागच्या 22 वर्षात पहिल्यांदाच भारताने टेस्ट मॅच गमावली आहे. या पराभवानंतर विराट कोहली समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आता या सीरिजची एकही मॅच गमावली तर भारताला सीरिज जिंकता येणार नाही, सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला खेळण्याचं टीम इंडियाचं स्वप्नही भंगेल.