पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?
क्रीडा

पाकिस्तानच्या या स्टार क्रिकेटरने केले महिलेचे लैगिंक शोषण?

कराची : पाकिस्तान संघाचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचं सांगितलं असून या महिलेनं पत्रकार परिषद घेत लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती महिला बाबर आजमवर आरोप करत असल्याचं दिसते आहे.

पत्रकार परिषदेत महिला म्हणाली की, बाबर आजमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. आम्ही एकत्र शिकलो आहे. एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे आमच्यात चांगली मैत्रीही झाली होती. २०१० मध्ये बाबर आजमनं लग्नासाठी मला प्रपोज केलं होतं. माझाही होकार होता. मात्र आमच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे २०११ मध्ये बाबर मला पळवून घेऊन गेला. त्यानं मला वेगवेगळ्या ठिकणावर ठेवलं. काही दिवसानंतर त्यानं लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. इतकेच नाही तर पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.