भोपाळ : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील नेमवार येथे एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने त्यांचे मृतदेह स्वत:च्याच मालकीच्या शेतात पुरण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाचही जणांचे पुरलेले मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या कुटुंबाला अनुसूचित जाती/जमाती कायद्यान्वये ४० लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या […]
Tag: क्राईम
मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून
नवी दिल्ली : इतर धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनंतर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ५५वर्षीय मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. […]
उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश
लखनौ : उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर झाल्याचे उघड झाले असून याचा एटीएसकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. एटीएसने आज (ता. २१) सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली असून राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलं […]
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
नागपूर : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली या भागातील ही घटना आहे. नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, […]
पुण्यात दुहेरी हत्याकांड; आई आणि पाच वर्षाच्या मुलाची हत्या, पती बेपत्ता
पुणे : पुण्यात दुहेरी हत्याकांड घडल्याची घटना घडली आहे. पाच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली असून सासवड-जेजुरी रस्त्यावरील एका गावात महिलेचा मृतदेह आढळला. तर तेथून ३५ किमी दूर कात्रजजजळ पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला. दरम्यान पती बेपत्ता असल्याने प्रकरणाचं गूढ वाढलं असून पोलीस सध्या तपास करत आहेत. आलिया अबीद शेख आणि आयान यांची हत्या […]
पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगाऱ्यां अटक
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई केली आहे. भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोडी रस्त्यावर असणाऱ्या डोंगराजवळ जुगार अड्डा हनुमंत माणिक थोरात चालवत असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार भिगवण पोलिसांनी रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश करत जुगार अड्यावर छापा मारून कारवाई केली. जुगाऱ्यांच्या पळून जाण्याच्या […]
भारतीयांना २५० कोटींचा गंडा; चीनी अॅपद्वारे कारनामा
नवी दिल्ली : एका चिनी अॅपच्या माध्यमांतून भारतीयांना २५० कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडमध्ये पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटकही केली आहे. चीनच्या एका स्टार्टअप योजनेअंतर्गत तयार झालेल्या एका अॅपने लोकांना गंडा घातला आहे. देशातल्या जवळपास ५० लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं […]
महाराष्ट्राला काळीमा! जातपंचायतीच्या जाचामुळे बहिणींकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा
चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. काय आहे घटना.. प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. […]
महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गँगरेप
मुंबई : महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रावर भेटलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इन्स्टावरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्यावर मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना […]
पुण्यात शिवसेना नेत्याची गुंडगिरी; हॉटेलवर गोळीबार करत महिलांना मारहाण
पुणे : पुण्यात शिवसेना नेत्याने गुंडगिरी केली असून सिंहगड परिसरात महिलांना मारहाण करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. राजकीय वादातून 40 ते 50 गुंडांसह गोळीबार करत सशस्त्र हल्ला केला असून पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी सिंहगड परिसरात असलेल्या खडकवासला गावच्या हद्दीत एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत खेड पंचायत […]