मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून
देश बातमी

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून

नवी दिल्ली : इतर धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनंतर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ५५वर्षीय मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. त्यांनी अब्दुलच्या विरोधात मुलीचे अपहरण केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अब्दुल आणि सुनीता हे दोघे प्रौढ असल्याने ही केस बंद करण्यात आली होती.

तीन आठवड्यापूर्वी सुनीता तिचा नवरा आणि दोन मुलांसह गावात आले होते. ती तिच्या सासरी राहत होती. तीन दिवसानंतर अब्दुलचे सलूनचे दुकान असल्याने तो मुंबईला परत गेला. दरम्यान, सुनीता गावात राहिल्यावर तिचे वडिल विश्वनाथ शर्मा तिला वारंवार मुंबईत जाण्यासाठी दबाव टाकत होते. रविवारी सायंकाळी, सुनीता तिच्या घराबाहेर असल्याचे वडिलांनी पाहिले. तेव्हा तिला मुंबईस परत जाण्यास सांगितले. त्यांच्यात खूप भांडण झाले. विश्वनाथने सुनीताला दगडाने डोक्यात मारले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला.