पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत विल्यमसनची नव्या विक्रमाला गवसणी
क्रीडा

पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत विल्यमसनची नव्या विक्रमाला गवसणी

नवी दिल्ली : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक ठोकत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मंगळवारी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात केन विल्यमसनने हेन्री निकल्स याच्यासोबत ३६९ धावांची भक्कम भागीदारी उभारली. याचसोबत विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील ७ हजार धावांचा टप्पा गाठला. केन विल्यमसन हा कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात कमी डावांमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज […]

भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव
क्रीडा

भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव

नवी दिल्ली : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा विजय झाला असला तरी पाकिस्तानला मात्र पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू अशी म्हणण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड संघानं पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे. दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं १-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या ३७३ धावांच्या विजयी लक्ष्यापुढे […]

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश
क्रीडा

अखेरच्या सामन्यात पाकिस्तानची बाजी; टाळला व्हाईटवॉश

नेपियर : न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली असून व्हाईटवॉश नामुष्की टाळली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १७४ धावांचं आव्हान पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केलं. अखेरचा सामना गमावला असला तरीही न्यूझीलंडने मालिकेत २-१ने बाजी मारली आहे. तिन्ही सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या टीम सेफर्टला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तान संघाने यजमान न्यूझीलंडवर ४ गडी […]

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना
क्रीडा

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान न्यूझीलंडने टीम सेफर्ट आणि केन विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर […]

न्यूझीलंडने डावाने जिंकली सलग दुसरी कसोटी; विंडीजला व्हाईटवॉश
क्रीडा

न्यूझीलंडने डावाने जिंकली सलग दुसरी कसोटी; विंडीजला व्हाईटवॉश

न्यूझीलंडच्या संघाने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करत सलग दुसऱ्या कसोटीत डावाने विजय मिळवला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिजचा डावाने पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने विंडीजवर १ डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सचं शतक आणि कायल जेमिन्सनचा भेदक मारा ही प्रमुख […]

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूंना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिला थेट इशारा; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंना न्यूझीलंड बोर्डाने दिला थेट इशारा आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंना अखेरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझलंडमधील बायो सेक्युअर बबलचे नियम मोडले होते. ज्यानंतर संघातील सात खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने, आता नियम मोडाल तर पूर्ण […]