दिलासादायक! गेल्या ३ दिवसांपासून हिंगोलीत ना कोरोना रुग्ण, ना मृत्यू
बातमी मराठवाडा

दिलासादायक! गेल्या ३ दिवसांपासून हिंगोलीत ना कोरोना रुग्ण, ना मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हिंगोलीकरांची दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिंगोलीत कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्याचबरोबर कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गेली वर्षेभर येणाऱ्या मृत्यू न झालेले दिवस आरोग्य यंत्रणेला कमालीचा आनंद देणारा आहे. हे हिंगोली प्रशासनाचे मोठे यश मानले जात आहे. यापूर्वीही हिंगोली प्रशासनाने कोरोनाविरोधी लढ्यात कायम आघाडी घेतलेली आहे. […]

धक्कादायक ! वाळू माफियांकडून जि. प. अध्यक्षास बेदम मारहाण
बातमी मराठवाडा

धक्कादायक ! वाळू माफियांकडून जि. प. अध्यक्षास बेदम मारहाण

हिंगोली : महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे. वाळू माफियांकडून हिंगोलीच्या जिल्हा परिषद अध्यक्षास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले गावाकडून जिल्हा परिषदेच्या शास्त्रीनगर भागातील त्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे सरकारी वाहनात येत असताना, समोरून येणार्‍या वाळूच्या टिप्परने […]

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी
बातमी मराठवाडा

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी

हिंगोली : जात प्रमाणपत्रासाठी कोणत्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नसल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले आहे. शेवाळा येथे महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. हिंगोलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळा येथे कळमनुरी उपविभागीय कार्यालयामार्फत महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत 79 […]

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे  मुख्यमंत्र्यांना पत्र
बातमी महाराष्ट्र

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळ आणि नापिकी आणि कर्जबाजरीपणाला कंटाळून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना आपण पाहतो. मात्र हिंगोलीमधील एका तरुण शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप […]

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काही नवीन नियम जारी केले आहेत. याआधीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात रुचेश जयवंशी आणि हिंगोली प्रशासनाला मोठे यश आले होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला लागत असल्याचे दिसत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच उपयोजना म्हणून कडक पावले […]

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
बातमी मराठवाडा

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारने हिंगोली येथे २०१९मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पिडित महिलांना समुपदेशन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कळमनुरी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या […]