हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
बातमी मराठवाडा

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारने हिंगोली येथे २०१९मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पिडित महिलांना समुपदेशन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जिल्ह्यातील कळमनुरी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या पाच तालुक्यांतर्गत जून २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत जिल्हा महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत पाचही तालुक्यातून तक्रारी सखी ऑन स्टॉप सेंटरकडे आल्या होत्या. सेंटरच्या केंद्र प्रशासक अर्चना वानखेडे, विधी सल्लागार अॅड. अर्चाना भोजनकर समुपदेशन दिनेश पाटील आदींनी जिल्हा महिला बालविकास कार्यालयात पिडीत महिलांचे अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला बालविकास अधिकारी व्ही जी शिंदे यांच्या नेतृत्वात त्रैमासिक बैठक घेऊन उपस्थित पिडित महिलांचे समुपदेशन करुन जवळपास ६१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा, जिल्हा महिला बालविकास अधिकारी व्ही जी शिंदे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडले.