एअरटेलच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय
टेक इट EASY

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खूशखबर ! जिओला टक्कर देण्यासाठी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक खूशखबर असून जिओला टक्कर देण्यासाठी कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फायदा ग्राहकांसाठी होणार आहे. एअरटेलने १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये आता १.५ जीबी डेटा देणे सुरू केले आहे. रिलायन्स जिओने देशभरात राज्यांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केल्याने एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत एअरटेलच्या युजर्संना १९९ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये केवळ १ जीबी डेटा रोज मिळत होता. परंतु, आता या प्लानमध्ये युजर्संना १.५ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलची ही ऑफर काही निवडक युजर्संना दिली जात आहे. १९९ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लानमध्ये आता २८ दिवसांसाठी रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा दिला जाणार आहे.

ऑफरमध्ये काय मिळणार?
देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री मिळणार आहे. या रिचार्ज सोबत ग्राहकांना फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. एअरटेलच्या वेबसाइटवर आंध्र प्रदेश आणि तेलंगाना, कर्नाटकमधील काही सर्कलमध्ये काही निवडक नंबर्सवर १९९ रुपयांच्या रिचार्जवर रोज १.५ जीबी डेटा दिला जात आहे.