ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप
टेक इट EASY

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आलंय ‘हे’ स्वदेशी ॲप

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आता स्वदेशी ॲप आलं आहे. या ॲपचे नाव टूटर (Tooter) असं आहे. तुम्ही जर Tooter चं नाव पहिल्यांदा ऐकत असाल तर, या साइटला ट्विटरचं स्वदेशी व्हर्जन म्हटलं जात आहे

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Tooter नं हे ॲप भारतातच तयार केल्याचा दावा केला आहे. “भारताचं स्वत:चं असं स्वदेशी सोशल नेटवर्क असावं असं आम्हाला वाटतं. याशिवाय आम्ही अमेरिकन ट्विटर इंडियाचे डिजिटल कॉलोनी आहोत. ही ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वेगळी नाही. Tooter आमचं स्वदेशी आंदोलन २.० आहे.” असं Tooter ने आपल्या अबाऊट सेक्शनमध्ये नमूद केलं आहे.

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील Tooter वर त्यांचे अकाउंट बनवले आहे, जे की व्हेरिफाइड अकाउंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेता अभिषेक बच्चन, टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी या दिग्गजांचे देखील यावर ऑफिशिअर अकाउंट आहे. भारतीय जनता पार्टीचे देखील अधिकृत अकाउंट या प्लॅटफॉर्मवर आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.