कोरोना लसीसाठी अशी करा नोंदणी; या आहेत सोप्या स्टेप्स
टेक इट EASY

कोरोना लसीसाठी अशी करा नोंदणी; या आहेत सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : १ मे पासून १८वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी करुन स्लॉट पद्धतीने कोरोनाच्या लसीसाठी बुकींग केल्यानंतरच लस दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींची ज्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली तशीच नोंदणी करण्याची प्रक्रिया १८ वर्षांवरील सर्वांसाठी असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने लशीची मागणी वाढणार असून, गर्दी टाळण्यासाठी लशीची आगाऊ नोंदणी करून वेळ ठरवून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे १८-४४ या वयोगटातील नागरिकांना नोंदणी करूनच लस घेता येईल, असे केंद्राने म्हटले आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करता येईल. लसीकरणाची प्रक्रिया व कागदपत्रे या सर्व अटी सारख्याच असतील. लसीकरणावेळी आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. या टप्प्यात लस घेण्यासाठी सोप्या स्टेप्स आहेत.

अशी करा नोंदणी?
१. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका

२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून व्हेरिफायवर क्लिक करा.

३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. त्याठिकाणई आपली माहिती भरुन Registerवर क्लिक करावे.

४. मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

५. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल.

६. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल, ती भरावी.

७. आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अ‍ॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येते.