राज्यात लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यात लॉकडाऊन वाढला; मुख्यमंत्री जाहीर करणार निर्णय

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचं ठरवण्यात आलं आहे या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन वाढवण्याचा कल मंत्रिमंडळात दिसून आला. लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री अंतिम निर्णय जाहीर करतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लोकल ट्रेन निर्बंध कायम राहतील. 15 तारखेपर्यंत तसा निर्णय होईल.