एप्रिल फूल का केला जातो साजरा? जाणून घ्या मजेशीर कारण?
वायरल झालं जी

एप्रिल फूल का केला जातो साजरा? जाणून घ्या मजेशीर कारण?

नवी दिल्ली : प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यांतील १ तारखेला कोणाचीही गंमत करणे, मस्करी करणे, मिश्किलपणे फसवणे असे प्रकार जाणीवपूर्वक केले जातात. या दिवशी लोक एकमेकांसोबत थट्टा मस्करी करतात, एकमेकांना फसवतात. तरूणांमधे हा उत्साह अधिक असतो. पण हा दिवस अशा पद्धतीने का साजरा केला जातो? हे तुम्हाला माहित आहे का? या दिवसाचा संबंध थेट 1582 मध्ये घडलेल्या एका घटनेशी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही घटना 1582 ची फ्रान्समधील आहे. त्यावेळी फ्रान्स ज्युलियन कॅलेंडरमधून ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये विस्थापित होत होतं. फ्रान्सला हे नवीन वर्ष वसंत विषुववृत्तात साजरं करायचं होतं आणि तो दिवस होता 1 एप्रिल. पण नागरिकांना यामागील योजना समजली नाही आणि ते 1 एप्रिललाच नवीन वर्ष समजू लागले. तेव्हा फ्रान्सचे जवळपास सगळेच नागरिक हे फूल म्हणजेच वेडे ठरले होते. त्यांनी स्वताचीच फसवणूक गमतीशीररित्या केली होती आणि तेव्हापासूनच एप्रिल फूल हा दिवस गंमतीसाठी साजरा केला जातो.

1 एप्रिल 1582पासून हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जात आहे. एप्रिल फूल अधिकाधिक गमतीशीर करण्यासाठी अनेक चुटकुले, मिम्स ही सोशल मिडीयावर फिरताना दिसतात. तर हा असा एप्रिल फूलचा संपूर्ण इतिहास आहे.