पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा
वायरल झालं जी

पुढील ७ वर्षांत माणूस अमर होणार? गुगलच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा

मनुष्य अमर होण्याच्या कितीतरी कथा अगदी पूर्वापारपासून आपण ऐकत आलो आहोत. अगदी पूर्वीच्या युगापासून कितीतरी पुस्तक, चित्रपट आणि दंतकथांमध्ये मनुष्य अमर झाला तर? माणूस कसा अमर होईल? अशा कितीतरी गोष्टींचा उल्लेख असतो. दरम्यान आता लवकरच म्हणजे २०३० पर्यंत माणूस खरोखरच अमर होणार अशा चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. तर एका इंजिनीयरनं लिहिलेल्या टेक्नोलॉजी संबधित पुस्तकातील काही दाव्यांमुळे या चर्चा होऊ लागल्या आहेत. तर गूगल या जगविख्यात कंपनीमध्ये आधी काम करणारा एक इंजिनीयर Ray Kurzweil याने लिहिलेल्या The Singularity Is Near या एका पुस्तकात केलेल्या काही खळबळजनक दाव्यांमुळे मनुष्य हा प्राणी लवकरच अमर होणार अशा चर्चा होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा दावा करणारा शास्त्रज्ञ Ray Kurzweil याच्या ८६ टक्के भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेमका दावा काय?
तर Ray Kurzweil याने २००५ मध्ये एक पुस्तक लिहिलं ज्याच नाव होतं The Singularity Is Near. दरम्यान या पुस्तकात केलेल्या काही दाव्यांनुसार माणूस २०३० पर्यंत अमर होणार असून जेनेटिक्स, नॅनोटेक्नोलॉजी, रोबोटिक्स या काही गोष्टींमुळे हे शक्य होणार असं सांगितलं गेलं आहे. तर आता हे सर्व हायक्लास टेक्नीकल शब्द ऐकून चक्रावून जाऊ नका, या सर्वाचा सोपा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तर २०१७ मध्ये Ray Kurzweil याने भविष्याबद्दल सांगताना, २०२९ पर्यंत मनुष्य तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रगदी करेल की तो थेट अमर होऊ शकेल. माणून तोवर नॅनो टेक्नोलॉजी, रोबोटिक्स या सर्वाच्या मदतीने एज रिवर्सिंग नॅनोबॉट्स बनवेल. तर या बॉट्समुळे शरीरात खराब होणाऱ्या टिशू आणि सेल्सला लगेचच ठिक करायला मदत होणार आहे, ज्यामुळे माणसाचा वय वाढणार नाही तो अमर होऊ शकेल.

आधीही खऱ्या झाल्या आहेत भविष्यवाणी
तर Ray Kurzweil यांच्या या भविष्यवानीमुळे अनेक चर्चा होत असून विशेष म्हणजे Ray ने केलेल्या काही भविष्यवाणी आधी खऱ्याही झाल्या आहेत. त्याने दिलेल्या माहितीनुससार २००० वर्षापर्यंत कंप्युटर बुद्धीबळमध्ये जगातील आघाडीच्या खेळाडूला मात देईल. ज्यानंतर १९९७ मध्ये गॅरी कॅस्पारोवला कंप्यूटरकडून मात मिळाली. तसंच मनुष्यापेक्षा जास्त लॅपटॉप फास्ट होईल. २०१० पर्यंत जगातील बऱ्याच भागात अधिक चांगल्या दर्जाचं नेटवर्क मिळणार असही Ray Kurzweil यांनी म्हटलं होतं, ज्यातील बहुतेक दावे खरे होत असल्याने हा दावाही खरा होणार का? हे पाहावं लागेल.