उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ
वायरल झालं जी

उड्डाण घेताच विमानाला लागली आग; पाहा आकाशातील थरारक व्हिडिओ

नवी दिल्ली : धावपट्टीवरून आकाशात झेपावलेल्या विमानाच्या इंजिनाने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डावीकडून बाजूस धूर निघू लागला. त्यानंतर इंजिनमध्ये आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेनं विमानातील प्रवाशांना दरदरून घामच फुटला. अमेरिकेतील डेन्व्हेर विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर ही थरारक घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. अमेरिकेच्या विमान वाहतूक संचालन प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते, त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती विमान कंपनीने दिली. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला होता.

नंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आलं. प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्याने या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान उतरवण्यात आल्यानंतर ब्रुमफिल्ड पोलिसांनी विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.