तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजनंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणखी एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तांडव वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तांडव या सिरीजचा नुकताच एक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे ५९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिल्लीमध्ये घडणाऱ्या तांडवमध्ये सत्तासंघर्ष दाखवण्यात आला आहे. सत्तेच्या खेळात चूक किंवा बरोबर, सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि त्यासाठी शक्य असेल ते सगळं करणं हे सर्व या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

तांडव या वेब सीरिजच्या कथानकात एकूणच राजकीय पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. टायगर जिंदा है, भारत, सुलतान हे चित्रपट दिग्दर्शित करणारे अली अब्बास जफर तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित तांडव ही सीरिज ९ भागांची असणार आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार दिसणार आहेत. तांडव ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.