विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर
मनोरंजन

विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो आला समोर

क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. त्यानंतर आज विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराटचा भाऊ म्हणजेच विकास कोहलीने शेअर केलेला फोटो खास चर्चेत आहेत. विकासने विराट अनुष्काच्या मुलीच्या इवल्याश्या पायांचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय. आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आलीय, अशी कॅप्शन विकासने या फोटोला दिली आहे. फोटोवर वेलकम म्हणजेच तुझे स्वागत आहे असा मजकूरही लिहिलेला आहे.

कोहली कुटुंबातील सर्वच सदस्य या नवीन पाहुणीच्या आमगमाने खूपच आनंदात आहे. तर दुसरीकडे विराट आणि अनुष्का आई-बाबा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे चाहत्यांनाही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून विराट अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

सोमवारी दुपारी विराटने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.