देश बातमी

सीरम इंस्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे आजपासून देशभरात वितरण सुरु

पुणे : देशभरात येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणासला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला केंद्र सरकारकडून लशीची पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर आजपासून सीरमच्या कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळाल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर पैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता रवाना झाले. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे. दरम्यान, त्याआधी इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची पूजा करण्यात आली. परि मंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून या कंटेनर्सना मार्गस्थ करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला.

केंद्र सरकारने लस खरेदीसाठी काल सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली होती. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी’ आणि “ऍस्टाझेनेका’ यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील “एसआयआय’मध्ये विकसित झालेल्या “कोव्हिशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या “सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन”ने1 जानेवारीला परवागनी दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर “एसआयआय’ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. प्रत्यक्षात 11 कोटी लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती “एसआयआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.