उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
राजकारण

उत्तरप्रदेशात विधानसभेचं वाजलं बिगुल; मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

लखनौ : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान घातलेलं असताना भारतीय जनता पक्षांन उत्तरप्रदेशातील विधानसभा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवण्यासाठी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाची बैठक झाली. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत आहे. विरोधकांकडूनच नाही, तर भाजपतील खासदार आणि नेत्यांकडून योगी सरकारवर टीका होत आहे. त्यातच अलिकडेच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपने सरकारची प्रतिमा चांगली करण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याचं काम सुरू केलं आहे.

याचं अनुषंगाने रविवारी भाजप-आरएसएसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील बन्सल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशात २०२२मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीचा निवडणुकीवर होणार परिणाम आणि त्यावर मात करून पक्षाला पुन्हा पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी आखायच्या रणनीतीवर आरएसएस आणि भाजपा नेत्यांची चर्चा झाली.

उत्तर प्रदेशात पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला झटका बसला. योगींच्या गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाने जोरदार टक्कर देत समान जागा मिळवल्या आहेत. तर मथूरा आणि इतर पंचायत समितीचे निकालही भाजपला चिंतन करायला लावणारे आहेत. या निकालातून धडा घेत आणि सध्या कोविड हाताळणीवरून होत आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपचे खासदार, मंत्री आणि नेतेच योगी सरकारवर टीका करताना दिसून आले, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.