अशीही राष्ट्रनिष्ठा! मुलांनी आईच्या अंत्ययात्रेत पार्थिव खाली ठेवून गायलं राष्ट्रगीत
बातमी विदर्भ

अशीही राष्ट्रनिष्ठा! मुलांनी आईच्या अंत्ययात्रेत पार्थिव खाली ठेवून गायलं राष्ट्रगीत

वाशिम : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईकांनी चक्क पार्थिव खाली ठेवून राष्ट्रगीत गात राष्ट्रगीताचा सन्मान केला आहे. मंगरुळपीर येथील किशोर […]

स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव आहे का?; मोदी सरकारने लोकसभेत दिले ‘हे’ उत्तर
बातमी विदर्भ

स्वतंत्र विदर्भ राज्याचा प्रस्ताव आहे का?; मोदी सरकारने लोकसभेत दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्रातून विदर्भ हा भाग वेगळा करून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीला राजकीय पाठबळ नसलं तरी याप्रश्नावर सातत्याने आंदोलने होत आली आहेत. अशावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपची याबाबत नेमकी भूमिका काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जात असून आज लोकसभेतील एका लेखी […]

धक्कादायक! पूराच्या पाण्यात एसटी बसच गेली वाहून गेली
बातमी विदर्भ

धक्कादायक! पूराच्या पाण्यात एसटी बसच गेली वाहून गेली

यवतमाळ : उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास उमरखेडवरुन ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. […]

वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील बुडाले ११ जण
बातमी विदर्भ

वर्धा नदीत बोट उलटली; एकाच कुटुंबातील बुडाले ११ जण

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाकडून सुरु आहे. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी […]

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम
बातमी विदर्भ

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम

गडचिरोली : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच विविध सण-उत्सवांमुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय […]

महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य

चंद्रपूर : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना चंद्रपुरात घडली आहे. जादूटोणा आणि भानामती केल्याच्या संशयातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी कुटुंबातील सात सदस्यांना झाडाला बांधून मारहाण केली. कुटुंबीयांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे. मारहाणीत […]

झाडाची पानं तोडल्याने मारहाण; दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी विदर्भ

आत्महत्यांचे सत्र थांबेना! अमरावतीत व्यावसायिकाची आत्महत्या

अमरावती : कोरोनानंतर व्यावसायिकांच्या आत्महत्यांच्या सत्रात वाढ झाली आहे. नैराश्यातून अमरावतीतील एका व्यावसायिकाने रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीवरून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर या व्यावसायिकाच्या शरीराचे सहा ते सात तुकडे सुमारे अर्धा किलोमीटर सापडले. राजेश दादासाहेब दानखेडे (वय ५९, रा. शंकरनगर, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात ते […]

धक्कादायक ! घराचा ताबा मिळवण्यासाठी 10 वर्ष फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह
बातमी विदर्भ

व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून २४ तासांत छडा

गोंदिया : गोंदिया शहरात व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची मॉर्निग वाकला जात असतांना एका अज्ञात आरोपीने पाठीमागून येत त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक […]

समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगावाजवळ समृद्धी महामार्गाच्या कामाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगावमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला डंपरवरुन १६ मजूर प्रवास करत होते. समोरुन येणाऱ्या बसला रस्ता देण्यासाठी डंपरचालकाने तो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तो पलटला […]

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना; पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
बातमी विदर्भ

पोलीस ठाण्यातच तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका २५ वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप होता आणि त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. शर्टच्या साहाय्याने गळफास लावून ही आत्महत्या केली आहे. अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून आणि बलात्काराच्या प्रकरणात अल्पवयीन […]