मोठी बातमी: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आज आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओमिक्रॉन व्हेरीएंटने बाधित असलेले दोन्ही रुग्ण हे भारतीय असून ते कर्नाटकातले रहिवासी आहे. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमिक्रॉन व्हेरीएंटची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. ६६ आणि ४६ वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमिक्रॉन व्हेरीएंटची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अगदी उंबरठ्यावर हा विषाणू धडकल्याचं चित्र बघायला मिळतंय.

या संबंधीत माहिती देताना सांगितले की लव अग्रवाल यांनी, ओमिक्रॉन व्हेरीएंटशी संबंधित दोन्ही रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉनने बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची ओळख पटली असून त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरां लक्ष असणार आहे. तसेच सर्व बाबींमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.