महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर…
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर…

मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत आहेत. यसाठी राज्याने आपल्या सीमा बंद केल्या आहेत, मात्र कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही. त्यामुळे जर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही. असा गंभीर इशारा कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर “जर सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि लोकांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर करोना इतर राज्यांमध्ये फैलावेल तो दिवस दूर नाही,” अशा शब्दांत डॉक्टर साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे. यावेळी बोलताना सुभाष साळुंखे म्हणाले की, ”कोरोना व्हायरस फक्त महाराष्ट्रातच राहणार असा विचार करु नका, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पावलं उचचली गेली नाही तर एप्रिल महिन्यात उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्रासारखी परिस्थिती असेल. ही वाढ अचानक झालेली नसून कोरोनाच्या संक्रमणासाठी अनेक घटक जबाबदार आहेत.

महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, ”रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीसाठी त्याला दोष दिला जाऊ शकतो. कोरोना रुग्णसंख्या वाढ होण्यामागे इतर गोष्टीदेखील कारणीभूत आहेत. महाराष्ट्रातील लोक जणू काही कोरोना संपला आहे अशा पद्धतीने विचार करत असून वागण्यातूनही ते दिसत आहे. करोना रुग्णसंख्या वाढीसाठी हा गैरसमजदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे,” असं डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या इशऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, राज्यात सोमवारी ९ हजार ६८ रूग्ण कोरोनामुक्त झाले असुन, ८ हजार ७४४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. राज्यात सोमवारपर्यंत एकूण ९७ हजार ६३७ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये दररोज आठ हजारांच्या वर नवीन करोनाबाधित आढळत असून रविवारी ही संख्या ११ हजारांच्या वर पोहचली होती. करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा करोनाबाधितांचीच संख्या अधिक आढळून येत होती. मात्र सोमवारी अनेक दिवसानंतर दिवसभरातील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली.