जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण
कोरोना इम्पॅक्ट

जो बायडन यांनी घेतली कोरोना लस; देशवासियांना आश्वस्त करण्यासाठी टीव्हीवर थेट प्रक्षेपण

अमेरिका : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये फायझर बायोएनटेक ची लस घेतली. हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी कोरोनाची लस घेणारे डॉक्टर जिल बायडनदेखील उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विशेष म्हणजे अमेरिकन लोकांना लसीच्या सुरक्षिततेबद्दल आश्वास्त करण्याच्या प्रयत्नात, हा कार्यक्रम थेट प्रसारित केला गेला. लस घेतल्यानंतर जो बायडन यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज मी कोरोनाची लस घेतली. दिवसरात्र मेहनत घेऊन हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे आभार. आम्ही तुम्हा खूप काही देणं लागतो. लस घेण्यामागील कारणही जो बायडन यांनी यावेळी स्पष्ट केले. बायडन म्हणाले की, ” जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतली.

तसेच, “अमेरिकेच्या नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा करोना लस उपलब्ध तेव्हा तुम्ही ती घ्यावी,” असं आवाहन जो बायडन यांनी केलं आहे. “जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार असेल पाहिजेत यासाठीच मी हे प्रात्यक्षिक केलं आहे. याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही,” असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जो बायडन यांनी लस घेतल्याने कमला हॅरिस यांनी ट्विट करत याला नेतृत्व म्हणतात अशा शब्दांत कौतुक केलं आहे. कमला हॅरिसदेखील पुढच्या आठवड्यात जाहीरपणे कोरोना लस घेणार आहेत.