ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?
राजकारण

ममता बॅनर्जींचा पवारांना फोन; पवार काय घेणार निर्णय?

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला आहे. ममता यांनी च्यासोबतच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचे आभार मानले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवारांशी चर्चेदरम्यान ममतांनी त्यांना आमंत्रणही दिले आहे. यावेळी इतर विरोधी पक्षातील नेते देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांची लढाई प्रामुख्याने तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात केंद्रीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि तृणमूल यांच्यातील संघर्ष आणखी वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी या भाजपविरोधी पक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. पुढील महिन्यात कोलकाता येथे एक रॅली काढली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच या सर्वांना ममता यांनी फोन केल्याचीही एक चर्चा आहे. आता याबाबत पवारही काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.