महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

महाराष्ट्रातील नव्या स्ट्रेनबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : ”देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात कोरोचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, देशात कोरोनाचे २४० नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त धोकादायक आहे.

महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या करोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.

तर राज्यामध्ये या आठवड्यापासून कमी होत असलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात 6281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 19,92,530 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16 % एवढे झाले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर, कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेन विरोधात पुर्णपणे प्रभावी नाही. मात्र, कोरोना लसीकरणामुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसारावर काही प्रमाणात रोख लावता येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, मागील २४ तासांत राज्यात ६ हजार ९७१ कोरोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे.

हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना गुलेरिया म्हणाले,”म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे वा करोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” असा अंदाज गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही करोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देशभरात करोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच करोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी यांनी सांगितलं.