वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
कोरोना इम्पॅक्ट

वाढत्या रुग्ण्संख्येच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, यापूर्वी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. नागरिकांकडून कोरोनासंबंधी नियमांचं योग्य पालन होत नसल्याने कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाटय़ाने होत असून दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या हजारापर्यत पोहोचली आहे. यादृष्टीने रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह सोमवारी बैठक आयोजित केली होती. यात पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी सहभागी होते.

मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने या खाटा कमी करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. परंतु आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने ही मागणी मागे घेतली आहे. खासगी रुग्णालयातील सर्व खाटा सोईसुविधांसह सज्ज आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कितीही वाढली तरी उपचार वेळेत दिले जातील, असे खासगी रुग्णालयाचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले आहे.

– राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी
– रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल.
– लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करू नये. दाखल रुग्ण आणि उपलब्ध खाटा याची माहिती देणारे डॅशबोर्ड आणि रुग्णालयातील फलक वेळोवेळी अद्ययावत केले जावेत.
– खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा अजूनही करोनाबाधितांसाठी राखीव आहेत.