सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण : आणखी दोघांना अटक
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण : आणखी दोघांना अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आले. या प्रकरणी जवळपास ३० पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता सेलिब्रिटी मॅनेजर राहुल फर्निचरवाला आणि उद्योगपती करण सजनानी या दोघांना सुशांत सिंह राजूपत ड्रग्ज प्रकरणी अटक केल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर कलाविश्वातील अनेकांची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आल्याचे पाहायला मिळाले. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर ड्रग्स पेडलर केजोचा भाऊ जगतप सिंग आनंदला अटक करण्यात आली.

जगतप सिंग आनंदलाही नुकतीच अटक करण्यात आली होती. तो मुंबईतील ड्रग्स व्यापारी असून तो ड्रग्स पेडलर केजो याचा भाऊ आहे. त्यांनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने फर्निचरवाला आणि सजनानी यांना अटक केली आहे.