अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत
बातमी मराठवाडा

अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत

मुंबई : देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे मुंबईत कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट लिहल्या होत्या. मात्र, अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते. तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे अॅडमिट केले होते. मागील 8 दिवसापासून ते अत्यवस्थ आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे यात काही शंका नाही. परंतु त्यांच्या निधनाचे वृत्त खोडसाळ असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी याबाबत संवाद साधला असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.