सायना चित्रपटाच्या पोस्टरमुळे परिणीती चोप्रा ट्रोल
मनोरंजन

सायना चित्रपटाच्या पोस्टरमुळे परिणीती चोप्रा ट्रोल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या सायना’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केले. मात्र या पोस्टरमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. याच कारण म्हणजे चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या नजरेस पडताच त्यामधील चुकीच्या गोष्टी अधोरेखित करणाऱ्यांची रिघ लागली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकिकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘The Girl On The Train’ च्या वाट्याला आलेल्या यशामुळं परिणीतीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे ‘सायना’ या चित्रपटाच्या पोस्टरमुळं मात्र अनेकांनी तिची खिल्लीही उडवली आहे. सायना हा चित्रपट बँडमिंटनपटू सायना नेहवालच्या आतापर्यंतच्या कारकिर्दी आधारित असल्यामुळं या खेळाशीच संबंधित असा शटल दाखवण्यात आला आहे. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाचा क्षण या च्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पोस्टर साकारण्यात आलं खरं, पण मुळातच बॅडमिंटनचं शटल अशा पद्धतीनं उडवलं जात नसल्याचं सांगत ही टेनिस खेळातील सर्व्हिसची पद्धत असल्याचीच बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली.

ट्विटरवरही सायना या चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळाला. ट्विटरवर एका युजरने लिहिलं आहे की, अशा पद्धतीची सर्व्हिस पाहून मी सायना आणि सानिया मध्ये गोंधळून गेलो. तर दुसऱ्या एका ट्विटरवर एका युजरने माझ्या मते, चित्रपटाची ग्राफिक्स डिझायनिंग टीमचा बॅडमिंटन आणि टेनिस मध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे सायनानं या पोस्टरला सहमती दिलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तेव्हा आता यावर चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार काय उत्तर देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.