देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगना रानौत वांद्रे पोलिस ठाण्यात हजर
मनोरंजन

देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगना रानौत वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

मुंबई : समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रानौतच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊ वांद्रे कोर्टाने कंगनाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; असा आदेश मुंबई पोलिसांना दिला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज कंगना बहिण रंगोलीसोबत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलीस स्टेशनमध्ये येण्यापूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपला आवाज दाबण्यात येतोय, असा आरोपही तिने केला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि रंगोलीने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंद केला. कंगनाच्या जबाबावेळी तिचे वकील रिजवान सिद्दीकीदेखील उपस्थित होते.

पेशाने कास्टिंग डायरेक्टर असणाऱ्या मुंबईतील साहिल सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे कोर्टात कंगनाच्या विरोधात देशद्रोह, धार्मिक तेढ वाढवणे, समाजात द्वेष निर्माण करणे या आरोपाखाली एक याचिका दाखल केली होत. यात अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाने समाजात तेढ निर्माण होईल, असे काही ट्वीट केले होते असे तिच्याविरोधातील याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर उच्च न्यायालयाने कंगनाला आज आपला जबाब नोंद करण्यासंबंधी आदेश दिला होता. त्यानुसार, कंगनावर आयपीसी कलम 153 ए, कलम 295 ए आणि कलम 124 ए अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी कंगनाचा जबाब नोंद केला आहे. संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतरच पोलीस पुढचा तपास करुन न्यायालायात अहवाल सादर करतील.