रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मालिकेत पाटणकरांची भूमिका साकारणारा अभिनेता अधिश पायगुडे आता नेलपॉलिश या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता अर्जुन रामपालसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. १ जानेवारीला झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफोर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. अण्णा नाईक, शेवंता, पांडू या सर्व व्यक्तिरेखांसोबत पाटणकर ही व्यक्तिरेखासुद्धा चांगलीच लक्षवेधी ठरली होती. नेलपॉलिश या चित्रपटाबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अधिश म्हणाला, कायद्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून शेड्स ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांना पहायला मिळतील. या चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. अर्जुन रामपाल, मानव कौल, आनंद तिवारी, रजित कपूर यांसारख्या कलाकारांबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.

अभिनयाची आवड जोपासण्यासाठी अधिशने इंजिनिअरिंगची नोकरी सोडून कलेसाठी पूर्णवेळ देण्याचे ठरवले. त्यानंतर विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एक रिकामी बाजू, बेईमान, मी रेवती देशपांडे यांसारख्या अनेक नाटकांसोबत जाऊ द्या ना बाळासाहेब, एक हजाराची नोट, तुंबाड, मेकअप चित्रपटांमध्ये सुद्धा अधिशने अभिनय केला आहे.