फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा येणार नवा शिवपट
मनोरंजन

फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा येणार नवा शिवपट

मुंबई : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर फर्जंद, फत्तेशिकस्त या यशस्वी चित्रपटांनंतर दिग्पाल आता एक नवा शिवपट घेऊन आला आहे. या चित्रपटातून शिव चरित्रातला एक नवा अध्याय उलगडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा आणि अफजलखानाच्या वधाचा प्रसंग प्रत्येक शिवप्रेमीला अभिमान वाटावा असा आहे. हाच प्रसंग शेर शिवराज है या चित्रपटात चित्रीत करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून लवकरच त्याचं चित्रीकरण सुरु होणार आहे. लवकरच या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित होईल. पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. शिवाजी महाराजांची वेगवेगळी रुपे दाखवणारी आठ चित्रपटांची शिवराज अष्टक अशी मालिका दिग्पालला करायची आहे.

हा चित्रपट या मालिकेतला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यापूर्वी दिग्पाल लांजेकरने फत्तेशिकस्त, फर्जंद या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचा जंगजौहर हा चित्रपट अजून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.