आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर
राजकारण

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर

मुंबई : राज्यातील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक ऐतिहासिक ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी सरकारची स्थपना केली. आता राज्यात आगामी महापालिका निवडणुकाचे वेध सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

”आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु. तसेच, एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु. ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे,” असे संजय राऊत म्हणाले.