भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश
राजकारण

भाजपला मोठा दणका; दोन मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

नाशिक : भाजपला मोठा दणका बसणार असून नाशिकमधील दोन मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून कळते. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.

दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर गीते त्यांच्यासोबत गेले. पुढे ते मनसेकडून आमदारही झाले. त्यानंतर ते सत्ताधारी भाजपमध्ये सामिल झाले. तर बागूल शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत आणि नंतर भाजपात गेले. सुनील बागूल यांच्या आई नाशिक महापालिकेत सध्या भाजपच्या उपमहापौर आहेत.