नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

नाना पटोले यांचा स्वबळावर लढण्याचा नारा; तर, महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल”. अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम मानली जात आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आणि विधिमंडळ पक्षाचे नेते ही दोन्ही पदं आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या नेत्याला देण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले हे काँग्रेर्सचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची चर्चा आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.

आघाडी सरकार चालवताना तारेवरची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसच्या होऊ घातलेल्या प्रदेशाध्यक्षांनी थेट स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल का? आपल्याच मित्र पक्षाविरोधात लढले का? आणि याचा परिणाम महाविकासआघाडी सरकारवर होईल का, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यावर पहिल्यांदाच पटोले यांनी प्रतिक्रिया देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी नाना पटोले पाडळे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी लवकरच मला नवी भूमिका पार पाडावी लागणार आहे.