मी कंबर हलवत नाही थेट हाडं मोडते; कंगनाचा कॉंग्रेस नेत्याला सणसणीत टोला
मनोरंजन

मी कंबर हलवत नाही थेट हाडं मोडते; कंगनाचा कॉंग्रेस नेत्याला सणसणीत टोला

अभिनेत्री कंगना राणौत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. शेतकरी आंदोलन असो वा महाराष्ट्र सरकार तिने प्रत्येक बाबतीत आपली परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. आता पुन्हा एकदा कंगना आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. काँग्रेस आमदाराने केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनाने सणसणीत टोला लगावला आहे. कंगनाने “आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते” असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचं झालं असं की, मध्यप्रदेश बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार सुखदेव पानसे काही दिवसांपूर्वी सारनीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कंगनाच्या आगामी धाकड सिनेमाचं चित्रिकरण थांबवण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी कलेक्टरच्या समोरच कंगनाला नाचणारी-गाणारी म्हटलं होतं. यानंतर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

यावर उत्तर देत कंगना राणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कतरीना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पानसे याच घटनेचा विरोध करण्यासाठी रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी निवेदन देताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. तसेच कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. पानसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांनी कंगनाच्या हातची कठपुतली बनायला नको. कारण सरकारं येत जात राहातात असं म्हटलं होतं.