गणेश नाईकांच्या एसआयटी चौकशीचं मागणीवर आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना सनसणीत टोला
राजकारण

गणेश नाईकांच्या एसआयटी चौकशीचं मागणीवर आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना सनसणीत टोला

मुंई : “गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, “कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं.. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते. साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचं वक्तव्य केलं होतं.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधानावर गणेश नाईकांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला.

याबाबत बोलतान सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईकांच्या चौकशीची मागणी केली होती.”महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचं उत्तर द्यावं. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुळे म्हणाल्या. तसेच, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.