इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या मुलाचं आपल्या वडिलांबाबत असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. बाबिल आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे तो कायम चर्चेतही असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. पण या मागचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. क्वाला असं त्याच्या चित्रपटाचं नाव असणार आहे. बाबिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी माहिती दिली आहे. त्याने या चित्रपटातला त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. त्याचसोबत चित्रपटाचा टीझरही त्याने शेअर केला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण बर्फाळ प्रदेशातलं असल्याचं टीझरवरुन लक्षात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अन्विता दत्त यांचं असून यात बाबिलसोबत तृप्ती डिमरी आणि स्वस्तिका मुखर्जी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसलेल्या मुलीची कथा आहे. या चित्रपटाबद्दल याव्यतिरिक्त अधिक खुलासा अद्याप झालेला नाही. या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कॅन्सरच्या आजारानं निधन झालं. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती संस्था क्लीन स्लेट फिल्मची असणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.