रसिका सुनीलचं जुळलं; या व्यक्तीला करतेय डेट?
मनोरंजन

रसिका सुनीलचं जुळलं; या व्यक्तीला करतेय डेट?

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या एका व्यक्तीला डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तिच्या खासगी जीवनामुळे ती पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रसिकाने मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचसोबत हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण असा सवालसुद्धा चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. कृतज्ञ राहण्यासाठी दिलेलं कारण तू आहेस, असं म्हणत रसिकाने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

लॉस एंजिलिसमधून रसिकाने हे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी इंडस्ट्रीतील काही कलाकारांसोबत रसिकाचं नाव जोडलं गेलं होतं. पण आता या फोटोंमुळे आदित्य नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दोन वर्षांपूर्वी रसिकाने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तेथेच तिची आदित्यशी ओळख झाली असून या दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.