कंगनाच्या ट्विटचा सिलसिला अद्यापही सुरूच; जे अखंड भारतावर प्रेम करतात…
मनोरंजन

कंगनाच्या ट्विटचा सिलसिला अद्यापही सुरूच; जे अखंड भारतावर प्रेम करतात…

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणौत एकापाठोपाठ शेतकरी आंदोलनावर सतत ट्विट करणे अद्यापही चालूच आहे. आताही तिने शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून ट्विट करत कृषी कायद्यला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, त्या सर्वांना गुड मॉर्निंग जे अखंड भारतावर प्रेम करतात, ज्यांना या देशाला तोडायचं नाही. केवळ त्या लोकांना गुड मॉर्निंग जे कृषी कायद्याला समजून घेतात आणि त्याचं समर्थन करतात. ते सर्व खरे देशभक्त आहेत. फसवणूक करणाऱ्यांपासून बचाव करा’. असे म्हंटले आहे.

दरम्यान, कृषी कायद्याला विरोध करणारे आंदोलन सुरु झाल्यापासून कंगना रानौतने आल्या ट्वीट चा सिलसिला सुरु केला आहे. ती कधी कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधते ते तर कधी बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधते. याआधीही कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट वादाचा विषय ठरले आहेत. जेव्हा कंगनाने शाहीन बागमधील आज्जीवर वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तिला सोशल मीडियातून ट्रोलचा सामना करावा लागला होता.

त्या ट्विटनंतरच तिचं दिलजीत दोसांजसोबत ट्विटर वॉर सुरू झालं होतं. गायकाने कंगनावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. कधी तथ्यांच्या आधारावर दोघांनी एकमेकांवर हल्ला केला तर कधी पर्सनल मुदद्यावरूनही हल्ले झाले. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या विषयावर बॉलिवूड सेलिब्रिटींही दोन भागात विभागले गेले आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कंगना राणौत सोशल मीडियावर सतत लिहित आहे. तिच्या वादग्रस्त विधानांवरही अनेकांनी टीका केली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.