संजय राऊतांना केशव उपाध्येंचे सणसणीत प्रत्युत्तर; पुढच्या निवडणुकीत…
राजकारण

संजय राऊतांना केशव उपाध्येंचे सणसणीत प्रत्युत्तर; पुढच्या निवडणुकीत…

मुंबई : ”संजय राऊत हे शिवसेना अजिंक्य असल्याचा दावा करतात. आम्ही भाजपच्या आमदारांना घरी बसवून सत्तेत आलो, असे ते वारंवार सांगतात. मात्र, याला विश्वासघात करणे म्हणतात. ज्या मित्रपक्षाच्या मदतीने तुम्ही निवडणूक जिंकलात त्यांचाच तुम्ही विश्वासघात केला, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ”महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, म्हणूनच १०५ आमदार आम्ही घरी बसवले. यावेळी त्यांचे १०५ आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील,” असा दावा केला होता. संजय राऊत यांच्या याच वक्तव्याला केशव उपाध्ये यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक सवाल विचारत केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांना केला आहे. तसेच, महाविकासआघाडीत एकत्र निवडणूक लढवताना एवढ्या जागा मिळणार नाहीत, याची मानसिकता शिवसेनेने तयार करावी, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिले.

काय म्हणाले होते संजय राऊत
मुंबई हे आपलं नाक आहे. इतकी वर्षे मुंबईत शिवसेनेची ताकद राहिली आहे. त्यामुळे आता आपले प्राधान्य मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेगळ्याच साच्यात घडवले आहे. आता तो साचा कुठे मिळणार नाही. त्यामुळे देशात शिवसेना ही अजिंक्य आहे. त्यामुळे आपण 105 आमदारांना घरी बसवले ना. पुढल्या विधानसभेला शिवसेनेचे 105 आमदार असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जनमताचा कौल मिळाला होता. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपाचा यावरुन दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली. एकमेकांशी २५ वर्षांहून अधिक काळ युती करणारे हे दोन पक्ष वेगळे झाले. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींचे आणि राजकीय नाट्याचे दोन महत्त्वाचे शिल्पकार होते एक होते संजय राऊत आणि दुसरे होते शरद पवार. संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे सांगत होते. त्यांनी त्यांचा शब्दही खरा करुन दाखवला. भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तीन पक्षांच्या युतीमुळे भाजपाला विरोधात बसावं लागलं.