कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे प्रसिद्ध तामिळ अभिनेत्रीचे निधन
मनोरंजन

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे प्रसिद्ध तामिळ अभिनेत्रीचे निधन

चेन्नई : मल्याळम आणि तमिळ चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री चित्रा यांचे शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. त्या ५६ वर्षांच्या होत्या. चेन्नईमधील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रा यांनी ८०च्या दशकात अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास तिन दशक इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यांनी मल्याळम आणि तमिळ भाषेतील १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या छोट्या पडद्यावरील तमिळ मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. पण २१ ऑगस्ट रोजी आर्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे.

चित्रा यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मल्याळम आणि तमिळ चित्रपटांशिवाय कन्नड, तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यांनी राजिया आणि एक नई पहेली या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. चित्रा यांचा जन्म २१ मे १९६५ साली केरळमधील कोच्ची येथे झाला होता.