प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!
क्रीडा

प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने पुढील महिन्यापासून यूएईमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील प्रिती झिंटाचा संघ पंजाब किंग्जला आयपीएलपूर्वी जबर धक्का बसला आहे. पण याची भरपाई म्हणून पंजाब संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपूर्वी संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अलिकडेच ऑस्ट्रेलियासाठी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसला झाय रिचर्डसनच्या जागी उर्वरित हंगामासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलचा १४वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हळूहळू संघांनी स्पर्धेसाठी कार्यक्रमस्थळी पोहचण्यास सुरुवात केली आहे. या हंगामातील उर्वरित ३१ सामने १५ ऑक्टोबरपर्यंत यूएईमध्ये होणार आहेत. सर्व फ्रेंचायझी संघ त्यांच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या ऐवजी इतर खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यात गुंतले आहेत.

पंजाब किंग्ज संघाने मोसमातील उर्वरित सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज एलिसला करारबद्ध केले आहे. बांगलादेशविरुद्ध टी-२० पदार्पणात हॅट्ट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या १५ जणांच्या संघातही स्थान देण्यात आले आहे.