नेहा प्रेग्नंट नाही; स्वतःच केला ‘त्या’ फोटोवर खुलासा
मनोरंजन

नेहा प्रेग्नंट नाही; स्वतःच केला ‘त्या’ फोटोवर खुलासा

मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने नवरा रोहनप्रीत सिंहसोबत बेबी बंपचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते. परंतु त्यानंतर नेहाने समोर येत स्वतःच या फोटोबद्दल माहिती दिली आहे. नेहा खरोखरच प्रेग्नंट नसून तिने हे सारं तिच्या आगामी गाण्यासाठी केल्याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती, असंही म्हटलं जात होतं. मात्र, आता नेहाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. १८ डिसेंबरला नेहाने रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसत होतं. त्यासोबतच तिने खयाल रख्या कर असं कॅप्शन दिलं होतं. तर रोहनप्रीतनेदेखील आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल, अशी कमेंट केली होती. त्यामुळे नेहा गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नेहाने तिच्या पोस्टमध्ये ती प्रेग्नंट असल्याचा उल्लेख कुठेही केला नव्हता.

नेहाच्या आगामी गाण्याचं नाव खयाल रख्या कर असं असून हे गाणं २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.