रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली
मनोरंजन

रजनीकांत यांचा कोरोना अहवाल नेगिटिव्ह; तरीही प्रकृती खालावली

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. मात्र तरीही त्यांच्या प्रकृती खालावली आहे. रजनीकांत गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबादमध्ये अन्नाथे सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता रजनीकांत आणि नयनतारा अन्नाथे या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रू मधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. यानंतर त्यांना हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षण नाहीत, पण रक्तदाबाचा त्रास आढळून आल्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आहे. रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे तसंच रुग्णालयात बारीक देखरेखही ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, हैदराबादला रामोजी फिल्म सिटीत अन्नाथे सिनेमाचं शूटिंग येथे सुरू होतं. सिनेमाचं हे शेड्यूल 45 दिवसांचं होतं. खबरदारी म्हणून निर्मात्यांनी इनडोर शूटिंगचा पर्याय निवडला होता. मात्र शूटिंगच्या क्रू मधील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सिनेमाचं शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. दुसरीकडे, रजनीकांत तमिळनाडूमध्ये राजकीय पदार्पणाची तयारी करत आहेत. लवकरच पक्षाची घोषणा करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.