भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट; ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद
देश बातमी

भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट; ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद

इंदूर : भय्यूजी महाराज ट्रस्टच्या १ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद वाढला आहे. भय्यूजी महाराज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. भय्यूजी महाराजांची कन्या कुहूने आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. आपल्या सावत्र आईने सर्व ट्रस्टी बदलले असून आपल्याला आर्थिक गैरव्यवहारांचा संशय येत असल्याचं म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय आहे प्रकरण?
मध्यप्रदेशमधील इंदूरमध्ये भय्यूजी महाराष्ट्र ट्रस्टच्या असणाऱ्या १ हजार कोटींच्या मालमत्तेवरून त्यांची कन्या कुहू आणि पत्नी डॉ. आयुषी यांच्यात वाद सुरू आहेत. पुण्यात असणारी कुहू ही आता इंदूरमध्ये दाखल झाली असून ट्रस्टच्या कारभारात आर्थिक गडबड असल्याचा आरोप तिने केला आहे. आपल्या अपरोक्ष सावत्र आईने सर्वच्या सर्व ११ ट्स्ट्री बदलले असून आपल्या वडिलांप्रमाणे आपल्याही जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे.

आपल्या अपरोक्ष अनेक कागदपत्रांवर आपल्या बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोपही कुहूनं केला आहे. कुहूच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांनुसार ट्रस्टच्या कारभाराचा वार्षिक अहवाल दिला जात नाही. ऑडिट रिपोर्टही दिले जात नसून मिनिट ऑफ मिटिंग्जही उपलब्ध होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.