हॉस्पिटलमधील रेमोचा पाहा भन्नाट व्हिडिओ; ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर झाली हार्ट सर्जरी
मनोरंजन

हॉस्पिटलमधील रेमोचा पाहा भन्नाट व्हिडिओ; ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर झाली हार्ट सर्जरी

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्याच्यावर हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ त्याच्या पत्नीने रुग्णालयातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून तो भन्नाट व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर देशभरातून नव्हे तर जगभरातील त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या प्रकृतीविषयी रेमोची पत्नी लीझेल डिसूझाने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे.

https://twitter.com/echawadimedia/status/1338514507258155010

रेमो डिसोजाच्या चाहत्यांना पत्नी लीझेल रुग्णालयातून सतत त्याच्या प्रकृतीविषयी माहिती देत ​​असते. आता हा व्हिडिओ शेअर करून, लीझेलने एक चांगली बातमी दिली आहे. या व्हिडिओमध्ये रेमो डिसूजा म्यूझिकवर पाय फिरताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लीझेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पायांनी नाचणे एक गोष्ट आहे आणि मनापासून नाचणे ही वेगळी गोष्ट आहे. रेमो डिसूझा… तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी सर्वांचे आभार! रेमोवर सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार चालू असून तो आयसीयूमध्ये आहे.