पेट्रोल-डिझेल दरवाढीची डिबेच चॅनलवर होणार नाही; ही आहे गोदी मीडिया
देश बातमी

पेट्रोल-डिझेल दरवाढीची डिबेच चॅनलवर होणार नाही; ही आहे गोदी मीडिया

नवी दिल्ली : पेट्रोल 90 रुपये आणि डिजेल 80 रुपयां जवळ पोहोचले असून याची चर्चा करण्यासाठी चॅनल्सवर डिबेट होत नाहीत कारण ही गोदी मीडिया असल्याचा आरोप पत्रकार रोहणी यांनी केला आहे. अशा आशयाचे ट्वीटही त्यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पत्रकार रोहिणी सिंह यांनी पेट्रोल-डिजलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, माझ्या लक्षात आहे की, वर्तमानपत्रात एक बातमी नेहमी पहिल्या पानावर छापली जायची, पेट्रोल-डीजल किमतीत वाढ ! ही बातमी ठरलेलीच असायची. पण आज पेट्रोल 90 रुपये आणि डिजल 80 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. तरीही कुठल्याही चॅनलवर डिबेट तर नाहीच आणि कुठल्याही वर्तमान पत्राची पेट्रोल डिझेल दरवाढीची हेडिंग नाही, ही गोदी मीडिया आहे, असे होणार नसल्याचे रोहिणी सिंह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात गोदी मीडिया मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्यानंतर गोदी मीडिया नावाच्या शब्दाविषयी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. यावरून अनेक पत्रकारांना प्रश्न केले जात आहेत. पत्रकार रोहित सरदानाच्या लाईव्ह डिबेटमध्येही एका नागरिकाने नुकताच गोदी मीडियाबाबत एक प्रश्न केला होता. तेव्हा याला उत्तर देताना गोदी मीडिया शब्दाचा उल्लेख करणारांना उलट प्रश्न करण्यात आले होते.