राज्यपालांच्या गाडीला अपघात; कार्यक्रमासाठी जाताना घडली घटना
देश बातमी

राज्यपालांच्या गाडीला अपघात; कार्यक्रमासाठी जाताना घडली घटना

चंदीगड : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या कारला आज (ता. १४) छोटासा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरली व रस्त्यालगत असलेल्या झाडीत शिरली. तर, गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा प्रकार घडला असल्याचे कार चालकाचे म्हणने आहे. या अपघातामुळे कारची समोरील बाजू दबली गेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यपाल दत्तात्रेय हे हैदराबादहून नलगोंडा जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग-६५ (हैदराबाद-विजयवाडा) वरून जात असताना, त्यांची कार रस्त्याच्या कडेला उतरून एका झाडीत शिरली. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही.

या घटनेनंतर राज्यपाल दत्तात्रेय घटनास्थळावरून अन्य वाहनाद्वारे पुढील प्रवासासाठी रवाना झाले. कार चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी केल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही बोलले जात आहे.