वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?
कोरोना इम्पॅक्ट बातमी

वर्क फ्रॉम होमबाबत राज्य सरकार घेणार निर्णय?

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनऐवजी इतर पर्यायांचा सरकार विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्यात वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊन गर्दी कमी करता येईल का याचा विचार सरकार करत आहे. वर्क फ्रॉम होमवर भर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असून वर्क फ्रॉम होम बंधनकारक करावे यासाठी राज्य सरकार खासगी कंपन्यांना आदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे ठरणारे नाही. यातून जर मार्ग काढायचा असेल तर ज्यांना शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. यामध्ये आयटी कंपन्या तसेच इतर ऑफीसेसचा समावेश असणार आहे. याच दृष्टीकोनातून राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. वर्क फ्रॉम होम केले तर बरेच जण घरुनच काम करतील आणि ट्रेन, बस आणि मेट्रोची गर्दी कमी होऊ शकते. याचमुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करून गर्दीवर आळा घालण्याचा सरकारचा विचार आहे.