इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात
देश बातमी

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल डीझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. असे असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंधनावरील दरवाढ पाहता धर्मसंकटाची स्थिती असल्याचे सांगत इंधनावरील कर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलणे आवश्यक असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिअतरमन म्हणल्या होत्या. दरम्यान, देशातील चार राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली असली, तरी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कपातीची शक्यता नाकारली आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रूपये उत्पादन शुल्क वाढवले होते.

राजस्थान
राजस्थानमध्येही करात कपात २९ जानेवारी २०२१ रोजी राजस्थान सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केली होती. राजस्थानने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट ३८ टक्क्यांवरून ३६ टक्के केला होता. यामुळे राजस्थानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या.

पश्चिम बंगाल
यानंतर पश्चिम बंगाल सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रत्येकी एक रुपयाची कपात केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेल एक रुपयाने स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून दरकपात करण्यात आली. आता याच मुद्यावरून पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आसाम
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारपूर्वी राजस्थान, आसाम आणि मेघालय या तीन राज्यांनीही इंधनावरील स्थानिक करात कपात केली होती. आसाम, मेघालयमध्येही इंधन स्वस्त आसाम सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त पाच टक्के अतिरिक्त कर रद्द केला होता. त्यामुळे आसाममध्ये पेट्रोल आणि डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले होते.

मेघालय
मेघालय सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात केली होती. मेघालय राज्य सरकारने पेट्रोलवर ७.४० रुपये आणि डिझेलवर ७.१० रुपये शुल्क कपात केली होती.